Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआज महापालिकेत समूह राष्ट्रगीत

आज महापालिकेत समूह राष्ट्रगीत

नाशिक । Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (amrit mahotsav freedom) उत्साहात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये नाशिक महापालिकेतर्फे समूह राष्ट्रगीत कार्यक्रम (Group National Anthem Program) उद्या मंगळवार (दि.९) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे…

- Advertisement -

महापालिकेच्या मुख्यालयातील सर्व सेवक सामूहिकरीत्या राष्ट्रगीत कार्य़क्रमात सहभागी होणार आहे. तसेच सर्व विभागीय कार्यालयातील अधिकारी, सेवक वर्ग विभागीय कार्यालयामध्येच (Divisional Office) सामूहिकरीत्या राष्ट्रगीत कार्य़क्रमाला हजर राहतील. महोत्सवानिमित्त विशेष लोगोसह महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई (Electric lighting) आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट (Attractive decoration) करण्यात आली आहे.

सध्या विविधरंगी आकर्षक रांगोळीने मनपा मुख्यालयाचे (Municipal Headquarters) सौंदर्य खुलत आहे. मंगळवारी सकाळी ध्वजस्तंभ आणि संपूर्ण परीसर फुलांनी सजवला जाणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या माहितीचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहे. एलईडी स्क्रिनवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे महापालिका आयुक्त ((Municipal Commissioner) डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्यासह अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन केेले आहे.

सायकल रॅलीचे आयोजन

मनपाच्या समूह राष्ट्रगीत कार्य़क्रमानिमित्त नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन (Nashik Cyclist Foundation) सकाळी ११.१५ वाजता सायकल रॅली काढणार आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ७५ सायकलीस्ट या रॅलीत सहभागी होणार आहेत. महापालिका मुख्यालयापासून कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल अशा मार्गाने पुढे गोल्फ क्लबला रॅलीचा समारोप होणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ (House to House Tricolor) या अभियानाच्या जनजागृतीसाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे अशी रॅली नंतरही १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण शहरातून काढली जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक (Chandrakant Naik) यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या