Saturday, May 4, 2024
Homeजळगावग.स. सोसायटी फसवणूक प्रकरण ; माजी अध्यक्षांसह व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ग.स. सोसायटी फसवणूक प्रकरण ; माजी अध्यक्षांसह व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव – Jalgaon

जिल्हा ग.स.सोसायटीची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात माजी अध्यक्ष विलास यादवराव नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन आज शनिवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

अध्यक्ष नसतांनाही कर्मचारी भरतीवेळी विजय प्रकाश पाटील या कर्मचार्‍याच्या नियमित वेतनश्रेणीचा बनावट आदेश काढून खोटे दस्ताऐवज सादर केले व ग. स. सोसायटीची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे माजी अध्यक्ष विलास यादवराव नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे या दोघांविरुध्द तत्कालीन अध्यक्ष मनोजकुमार आत्माराम पाटील (वय ५०,रा.रणछोडनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ८ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित विलास नेरकर व संजय ठाकरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर आज शनिवारी न्या. आर.जे. कटारिया यांच्या कामकाज झाले. युक्तीवादाअंती न्या. कटारिया यांनी दोघांचे अटकपूर्व जामीन नामंजूर केले. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या