Saturday, March 29, 2025
Homeक्रीडाIPL 2025 GT vs MI : आज मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स भिडणार; ...

IPL 2025 GT vs MI : आज मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स भिडणार; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासमोर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस आणि जियो हाॅटस्टारवर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

गुजरात टायटन्स संघाची धुरा शुभमन गिलकडे (Shubman Gill) असून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भुषविणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास गुजरात टायटन्सने ३ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे गुजरात टायटन्स संघाच्या घरच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये ३ सामने खेळविण्यात आले असून, हे सर्व सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत.

तर मुंबई इंडियन्स संघाला सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द (Chennai Super Kings) ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्याचा मुंबई इंडियन्स संघाचा इरादा असणार आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला देखील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स विजयी मार्गावर परतण्यासाठी सज्ज असणार आहे.

दरम्यान, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने ४ सामने खेळले असून, १ विजय संपादन केला आहे. तसेच गुजरात टायटन्सने १० सामने खेळले असून,६ सामन्यात विजय मिळविला आहे. तसेच ‌या मैदानावरील (Ground) सर्वाधिक धावसंख्या २४३ तर नीचांकी धावसंख्या १५२ इतकी राहिली आहे.

प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कुशल संघटकः डॉ. हेडगेवार

0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचा गुढीपाडवा या शताब्दी वर्षातील आहे. गुढीपाडवा हा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा...