Sunday, September 15, 2024
Homeनाशिकसर सलामत तो हेल्मेट पचास

सर सलामत तो हेल्मेट पचास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालविताना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे (Traffic rules) पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज जिल्ह्यात (Nashik District) ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ (No Helmet, No Petroll) ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे…

‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

आज स्वातंत्र्यदिनाचे (Independence Day) औचित्य साधून सद्भावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार आहेत. त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा उपक्रम स्तुत्य आहे.

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, अशी भावना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षत घेवून सर्व पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनादेखील यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

‘पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय म्हणाले की, नागरिकांच्या हितासाठी शासन योजना व मोहीम राबवित असते. त्या अनुषंगानेच जिल्ह्यात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलिस यांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केला आहे.

या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करण्यात आले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे.

या उपक्रमाची आ. सरोज अहिरे व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेट घालून पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून सुरूवात केली. यावेळी हेल्मेट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करून हेल्मेट वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या