Wednesday, July 24, 2024
Homeनाशिककरोनानंतर आता कुठे आपण आनंदी आहोत; पालकमंत्र्यांचे मालेगावकरांना आवाहन

करोनानंतर आता कुठे आपण आनंदी आहोत; पालकमंत्र्यांचे मालेगावकरांना आवाहन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

त्रिपुरातील (Tripura Incident) घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लीम संघटनांनी(Muslim Community) महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक दिली होती. मात्र, अतिसंवेदनशील असलेल्या मालेगावमध्ये सायंकाळी दगडफेक झाली. शांततेत सुरु असलेल्या बंदने अचानक हिंसक वळण घेतले. यानंतर नागरी आणि पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister chhagan bhujbal) यांनी मालेगाववासियांना शांतता पाळण्यासाठी भावनिक आवाहन केले…

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, मालेगावमध्ये अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोणी काहीही बरळतील त्यावर विश्वास ठेऊ नये. कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे. त्यामुळे कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा. (Dont spread rumors)

पोलिसांना सहकार्य करा. (Co-oprate with police) पोलिस त्यांचे काम करतील. आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या! असे सांगत मालेगावमध्ये शांतात अबाधित राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या