Monday, May 27, 2024
Homeनाशिकइर्शाळवाडी दुर्घटना : नाशिकच्या काझी गढीबाबत पालकमंत्र्यांच्या महत्वाच्या सूचना

इर्शाळवाडी दुर्घटना : नाशिकच्या काझी गढीबाबत पालकमंत्र्यांच्या महत्वाच्या सूचना

नाशिक | Nashik

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) खालापूर तालुक्यामधील (Khalapur Taluka) इर्शाळवाडी (Irshalwadi) येथे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची (Landslide) दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगितले जात असून १०० पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

Irshalwadi Landslide : “अन् आई-बाबांना पळताही आले नाही…”; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम

तसेच या दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू (Death) झाला असून ८० लोकांना वाचविण्यात यश आले आहे. अशातच आता या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक शहरातील अमरधाम परिसरात असलेल्या काझी गढीची (Kazi Gadhi) पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nashik : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षण भिंतीवर आदळली, दोघांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अमरधाम परिसरात असलेली काझी गढी सध्या धोकादायक स्थितीत आहे. याबाबत पूर्वी बैठका घेत उपाय योजनांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आज पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना या परिसरात काही रहिवाशी राहत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना जागेवर जावून पाहणी करण्याचे आदेश दिले.

Nashik News : सोफ्याच्या फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान

तसेच याठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहत असल्यास त्यांना इतरत्र हलविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त (Collector and Municipal Commissioner) यांना घटनास्थळी जावून पाहणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या