Friday, May 31, 2024
HomeनाशिकSaptashrungi Bus Accident : पालकमंत्री दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस; वैद्यकीय अधिकाऱ्यांना...

Saptashrungi Bus Accident : पालकमंत्री दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील वणी (Vani) येथील सप्तशृंगी गड (Saptshringi Gad) घाटात एसटी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. सदर अपघातात एका महिलेचा मृत्यू (Death) झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

Saptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

सदर घटनेची माहिती समजताच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली. त्यानंतर अपघातात जखमी (Injured) झालेल्या प्रवाशांची वणी येथील रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

दरम्यान, यावेळी दादा भुसे यांनी रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरांकडून जखमींवर सुरु असलेल्या उपचारांची (Treatment) माहिती जाणून घेतली व त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करावेत असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच आई सप्तश्रृंगी देवी चरणी प्रार्थना.

दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या