हरसूल | प्रतिनिधी | Harsul
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसेना (Shivsena) पक्ष (शिंदे गट) कटिबद्ध असून कार्यकर्त्यांनी जनतेच्या हिताच्या विकासासाठी कामे करावी असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले…
हरसूल (Harsul) येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, कातकरी वस्ती अंतर्गत रस्ता व पेव्हर ब्लॉक,शिवसेना पक्ष प्रवेश व कार्यकर्ता संवाद, श्रीकृष्ण मंदिर, दलपतपूर जिल्हा परिषद शाळा (मॉडेल स्कुल) सांस्कृतिक भवन उद्घाटन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी हरसूल येथील ग्रामपंचायत (Gram Panchayat) हॉलमध्ये २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदेगट) मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक हेमंत पवार, खा.हेमंत गोडसे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड,लोकसभा संपर्कप्रमुख गणेश कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भुसे म्हणाले की, हरसुलच्या ग्रामीण भागात (Rural Areas) कै.पांडुरंग राऊत यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या रुपात माजी जि.प.अध्यक्ष पद भूषविले होते. यामुळे शिवसेनाचा भगवा हरसुलच्या भागात अगोदर पासून रुजला आहे. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा (शिंदेगट) झेंडा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागावे, तळागाळातील जनतेच्या हिताच्या विकासाठी कटिबद्ध राहून काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
दरम्यान, याप्रसंगी नितीन लाखन,आखलाख शेख,सरपंच विष्णू बेंडकोळी,सरपंच संजय महाले,वामन खरपडे,अशोक लांघे,रघुनाथ गांगोडे,सुरेश भोये,बाबा शेंडे, पप्पू मेढे, लक्ष्मण मेघे,अरुण काशीद, लक्ष्मण भांगरे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.