Wednesday, June 26, 2024
Homeनाशिकशहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा - पालकमंत्री भुसे

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा – पालकमंत्री भुसे

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवार (दि.२८) रोजी रात्री उशिरा पोलिस आयुक्त कार्यालयात (Office Commissioner of Police) बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या प्रकरणाचा आढावा घेतला…

मोठी बातमी! मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन; सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या, नेमकं प्रकरण काय?

गेल्या महिनाभरात काही घटनांनी डोकं वर काढल्याने पालकमंत्री भुसे यांनी शहरातील (City) सर्व विभागांच्या पोलीस निरीक्षकांसह पोलिस आयुक्त तसेच उपायुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी भुसेंनी शहरात वाढलेली गुन्हेगारी खून, गाड्यांची तोडफोड याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nashik News : जनतेच्या हिताच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे – पालकमंत्री भुसे

दहशत निर्माण करण्याच्या हेतून काही समाजकंटक शहराची कायदा सुव्यवस्था (law and order) बिघडवत आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपींना (Accused) कठोरातील कठोर शिक्षा करण्याच्या आदेशाबरोबरच शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन वाढविण्याच्या सूचना देखील पालकमंत्री भुसे यांनी दिल्या.

Maharashtra Government : राज्यातील दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तसेच रस्त्यावर पोलिस (Police) दिसत नाही ही नागरिकांची तक्रार लक्षात घेऊन पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना देत येत्या काही दिवसात पोलिसांची विशेष कोंबींग मोहीम हाती घेत कारवाई अजून तीव्र करण्यात यावी असे, भुसे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sanjay Raut : …तर लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती

- Advertisment -

ताज्या बातम्या