Wednesday, May 29, 2024
Homeजळगावतिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात गडबड- ना.गुलाबराव पाटील

तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात गडबड- ना.गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

राज्यातील शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी (ncp) हा तिसरा भिडू आल्यामुळे खातवाटपात थोडीफार गडबड होण्याची शक्यता असल्याचे विधान पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी केले.

- Advertisement -

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर ना. पाटील यांनी माहिती दिली. ना.पाटील म्हणाले की, आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथी वणी गडावरील अपघाताची घटना घडली, त्यामुळे मला नाशिक यावे लागले, त्याठिकाणाहून मी गावी आलो. उद्यापर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असे मी ऐकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खातेवाटपाबाबत बोलतांना ना. पाटील यांनी सांगितले की, कुणाला काय खांत मिळेल हा निर्णय वरिष्ठ ठरवतील. तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, खातेवाटपावरुन एकमेकांमध्ये नाराजी राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थ खात्याच्या बाबतीतही वरिष्ठ जो निर्णय येतील तो सर्वांना मान्य असेल. त्यामुळे नुसत्या वावड्या उठवल्या जात आहेत, पण तसं काही नाहीये…तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या