Monday, November 25, 2024
Homeनगरमहिला सशक्तीकरण मेळावा यशस्वी करा - ना. विखे

महिला सशक्तीकरण मेळावा यशस्वी करा – ना. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे आणि मेळाव्याचे उत्तम नियोजन करावे, अशा सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. शिर्डी येथे आज शुक्रवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार्‍या महिला सशक्तीकरण मेळाव्या संदर्भात साईबाबा संस्थानच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

ना. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांची कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मेळाव्यात लाभार्थी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासह आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात यावी. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळांवरून झालेल्या तयारीची पाहणी केली. प्रसादालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेती महामंडळाच्या मैदानावर महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या तयारीचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या