Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यासभा घेत बसू नका, शेतकर्‍यांना भेटा; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना...

सभा घेत बसू नका, शेतकर्‍यांना भेटा; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सल्ला

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदेंना हेच सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेत आहेत, तिथे सभा घेऊ नका. महाराष्ट्रात प्रश्न प्रलंबित आहे. पेन्शन असो की, अन्य प्रश्न विषय संपवावा. एवढेच नव्हेतर अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ते बांधावर जाऊन पहा असा सल्लाही त्यांनी दिला.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर टीका केली. शिवसेना का सोडावी लागली हे सांगतानाच राज ठाकरे यांनी राज्यात जे राजकारण गेल्या अडीच वर्षापासून घडतंय त्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते, आमदारांना भेटायचे नाहीत. मग 40 आमदार कंटाळून सोडून गेले. मग 20 जून 2022 ला सुरत-गुवाहाटी-गोवा प्रवास झाला. महाराजांनी सुरतेची लूट करून आणली इथे हे लुटून सुरतेला गेले, असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्यामागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. खेडमध्ये सभा घेतली घेतली शिंदेनी खेडमध्ये सभा, थांबवा हे, असं राज ठाकरे म्हणाले.

अमित शाह ह्यांनी चार भिंतीत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून घेत होते तेंव्हा का नाही आक्षेप घेतलात ? सुशोभीकरणाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी थांबवा. आज बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी अडचणीत आहेत. या प्रश्नांसाठी जनता सरकारकडे बघत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. असं सरकार मी नाही पाहिलं. राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे. त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल, असं राज ठाकरे म्हणाले.

अनधिकृत मजारवरून सरकारला अल्टीमेटम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहीम समुद्र किनार्‍याच्या आतमध्ये अनधिकृत मजार बांधली गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ दाखवला आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी हा व्हिडिओ दाखवत इशारा दिला आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहिल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या