Thursday, May 30, 2024
Homeदेश विदेशHospital Fire : १०० हून अधिक रुग्ण असलेल्या रुग्णालयाला भीषण आग

Hospital Fire : १०० हून अधिक रुग्ण असलेल्या रुग्णालयाला भीषण आग

अहमदाबाद । Ahmedabad

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची समजताच रुग्णालयातील सुमारे १०० रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याविषयीची माहिती पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, शहरातील साहिबाग परिसरात असलेल्या राजस्थान हॉस्पिटलच्या तळघरात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.पोलीस निरीक्षक एमडी चंपावत यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरातून धूर निघत आहे. रुग्णालय बहुमजली असून जवळपास १०० रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान हॉस्पीटलला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अहमदाबाद शहरातील हे रुग्णालय फार मोठे आहे. हे रुग्णालय एका चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवण्यात येतं. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी केवळ गुजरातेतूनच नाही तर देशातील अनेक राज्यांतून रुग्ण येत असतात. परंतु याच रुग्णालयात आग लागल्याची घटना घडल्याने गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या अनेक मजल्यांवर धुराचे लोट पसरल्याने रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बाहेर काढण्यात आलेल्या रुग्णांना उपचारासाठी नजीकच्या दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या