Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCar Accident : ट्रकला धडक दिल्याने कारचा चक्काचूर! सात जण जागीच ठार,...

Car Accident : ट्रकला धडक दिल्याने कारचा चक्काचूर! सात जण जागीच ठार, ‘ती’ चूक जीवावर बेतली

अहमदाबाद | Ahmedabad

गुजरातमधून भीषण अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये सकाळी हा अपघात झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील लोक श्यामला जी मंदिरात दर्शन करून अहमदाबादला परतत होते. त्यावेळी त्यांची कार मागून एका ट्रकला धडकली. त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढणं कठीण झालं होतं. कटरने कापून कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

दरम्यान कार चालकाचा डोळा लागल्याने ही भयंकर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अपघातावेळी कारचा वेग १२०च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी भयंकर होती ही कारचा अक्षरश: चुराडा झाला. सध्या पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...