Saturday, June 7, 2025
Homeजळगावतुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही-गुलाबराव देवकर

तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही-गुलाबराव देवकर

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

- Advertisement -

जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात झोकून दिले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे.

देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील अशी ग्वाही देखील श्री.देवकर यांनी दिली. यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, महिला तालुकाध्यक्ष जनाबाई पाटील, संतोष सोनवणे, विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृऊबासचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, डॉ.नितीन पाटील, सोनवदचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच नारायण देवरे, वंजारी खपाटचे तुषार चौधरी, विजय चौधरी, डॉ.दीपक पाटील, विकास चौधरी, बबलू काकडे, गोपाल चौधरी, अहिरे येथील शरद पाटील, संजय पाटील, पष्टाणे येथील अभय पाटील, विनायक पाटील, तरडे येथील चंद्रकांत पाटील, सोनवद येथील बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पवार, संजय पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भटू पाटील, पिंप्री खुर्दचे सुरज बच्छाव उपस्थित होते.

तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही!
गुलाबराव देवकर यांना प्रचार रॅलीदरम्यान निंभोरा (ता.धरणगाव) येथील रोहिदास पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णराव पाटील, शालीग्राम पाटील, बाळकृष्ण बोरसे, मांगोलाल सोनवणे, नितीन पाटील, पिंटू पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, पुडलिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, अनिल पाटील, जगदीशबोरसे यांनी सुमारे 25 हजार रूपयांचा मदत निधी सोपविला. तुमच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना श्री.देवकर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
चांदवड । प्रतिनिधी Chandwad तालुक्यातील राहुड येथील पाडगण मळा येथे घराबाहेर पोर्चमध्ये झोपलेल्या महिलेवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढविल्याने ती गंभीर जखमी झाली....