Friday, April 25, 2025
Homeराजकीयनारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी !

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

नारायण राणे हे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये.

- Advertisement -

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही, अशा शब्दात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले.

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावरून केली होती.

यावर रविवारी ना.गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काहीही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात.

शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते, असाही ना.पाटील यांनी टोला लगावला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाचे घर- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा...