Friday, April 25, 2025
Homeजळगावबाळासाहेबांची पुण्याई अन जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार - गुलाबराव पाटील

बाळासाहेबांची पुण्याई अन जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार – गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी

ममुराबाद, मोहाडी, दोनगाव, आव्हाणी, फुलपाट, धानोरा, टाकळी या भागात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी धनुष्यबाणाचा जल्लोष पाहायला मिळाला. माध्यमांशी संवाद साधताना, ना.पाटील यांनी खा.संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सांगितले की, होय, हा सामान्य टपरीवालाच बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करणार आहे. आपण गावोगावी रस्ते, मुलभूत सुविधा देवून आणि पूल बांधले आणि गावं जोडण्याचे काम करून जनतेच्या सुखं आणि दु:खात माणसं जोडण्याचे काम केले आहे.

- Advertisement -

ममुराबाद येथे खंडेराव महाराज मंदिरासाठी 3 कोटींच्या निधीतून सुधारणा, या भागातील विविध गावांत रस्ते, पूल, स्मशानभूमी, ट्रांसफार्मर आणि शेती रस्ते, नवी ग्रामपंचायत भवन बांधून लेंडी नाला, पिंप्राळा रोड, कानळदा रस्ता व लवकी नाल्यावर चार पूल केल्याने तसेच मुस्लिम वस्तीत कब्रस्तान, संरक्षक भिंत, शादी खाना, उर्दू शाळेपर्यंत रस्ता, बौद्ध विहार, गावअंतर्गत सोयी सुविधा, कंपाउंडसह आधुनिक स्मशानभूमी, दोनगाव पासून शेरी, कानळदा, पथराड, खेडी हे शिव व शेती रस्ते दरजोत्थान करून डांबरीकरण अश्या विविध सुविधा केल्या ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी गुलाबराव पाटलांचे स्वागत केले. मोहाडी येथे घोड्यावरून, ममुराबादमध्ये ओपन जिपमधून आणि इतर भागात पायी रॅली काढून त्यांनी प्रचार केला. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, संजय पाटील, डी.ओ.पाटील, शिवराज पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जनाआप्पा कोळी, अनिल भोळे, तुषार महाजन, ममुराबाद-महेश चौधरी, सरपंच हेमंत चौधरी, शैलेंद्र पाटील, भरत शिंदे, अमर पाटील, राहुल ढाके, त्या-त्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार दौरा- दि.15रोजी चांदसर- स.8.30 वा., कवठळ- स.9 वा., चोरगाव- स.9.30 वा., धार- स.10.30 वा., शेरी-स.11 वा., पथराड बु- स.11.30, वा., पथराड खु- दु.12.30 वा., बांभोरी प्र. चा : दु. 4.00 वा. गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा-भोकर-संध्या. 6 वा. तसेच कानळदा-रात्री 8 वाजता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...