Monday, March 31, 2025
Homeमनोरंजनदुबईत साजरा होणार 'गल्फ सिने फेस्ट २०२१'

दुबईत साजरा होणार ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’

मुंबई | Mumbai

चंदेरी दुनियेचा झगमगाट विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमधून आपल्याला पहायला मिळत असतो.

- Advertisement -

मात्र करोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील हा झगमगाटाचा दिमाख काहीसा कमी झाला आहे. आता नवी उमेद व जोश घेऊन सातासमुद्रापार ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे.

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये २० ते २३ जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रिमीयर सोहळा रंगणार आहे.

या सोहळ्यामध्ये २०२१ या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. उत्तम आशय विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : “मी गुढी-बिढी काही…”; काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचे विधान...

0
मुंबई | Mumbai राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद...