Friday, May 3, 2024
Homeनगरगुंजाळेत सरोदेंना मारहाण, चारजणांवर गुन्हा

गुंजाळेत सरोदेंना मारहाण, चारजणांवर गुन्हा

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

आमचे घरचे लोक इथे राहतात, तुम्ही आपापसांत शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने चारजणांनी मिळून देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दि. 30 नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडली. या मारहाणीत देवीदास सरोदे हे जखमी झाले आहेत. राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील रहिवाशी असलेले देवीदास हरिभाऊ सरोदे (वय 45 वर्षे) हे दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर उभे होते.

- Advertisement -

तेव्हा त्यांचे घराचे पाठीमागे या घटनेतील आरोपी एकमेकांना शिवीगाळ करीत होते. तेव्हा देवीदास सरोदे त्यांना म्हणाले, आमचे घरचे लोक येथे राहतात. तुम्ही आपसात शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यावेळी देवीदास सरोदे यांचा मुलगा व सून हे भांडण सोडविण्यास आले. तेव्हा आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. असे सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सरोदे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गिताराम रमेश तांबे, नितीन रमेश तांबे, रमेश सोपान तांबे तसेच ताराबाई रमेश तांबे सर्व राहणार गुंजाळे ता. राहुरी या चार जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या