Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्यानावासोबत पाटील लावता, मग आरक्षण कशाला हवं?; गुणरत्न सदावर्तेंचा पलटवार

नावासोबत पाटील लावता, मग आरक्षण कशाला हवं?; गुणरत्न सदावर्तेंचा पलटवार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मनोज जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. आरक्षण उच्च वर्गासाठी नसते. मनोज जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. शरद पवार त्यांच्या पाठिशी आहेत. जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचे ज्ञान नाही. काही आकलन नाही, मनोज जरांगे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.

जातीवर आधारित सभांना आम्ही समर्थन देत नाही. हा देशासाठी मोठा धोका असतो. त्यामुळे मनोज जरांगेंच्या सभांना केवळ मी एका जत्रेसारखं पाहतो. याठिकाणी लोक येतात आणि मौजमजा करुन निघून जातात. त्याप्रकारे त्याठिकाणी काही वैचारिक घडलं नाही. त्यांचे बोलणं मग्रुरी आणि माजोरीपणाचं होतं. यावरुन त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. काहीतरी मृगजळ दाखवून लोकांना एकत्र आणून गलिच्छ राजकारण केलं जातंय. हे राजकारण शरद पवार हेच करत आहेत. त्यांचाच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. माझ्या ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेवर टीका त्यांनी केली. पण, ही घोषणा जातीवाचक नाही. ही गोष्ट सैन्यातील आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत होते. बरगळत होते, असा हल्लाोबोल त्यांनी केला.

सदावर्ते पुढे म्हणाले की, जरांगेंनी राजकारणी लोकांची नावे घेऊन जरांगेचे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत, त्यांना आज लॉयल असल्याचे दाखवून दिले आहे की तो किती प्रामाणिक आहे. त्यामुळे बिनबुडाच्या आणि रानभूल लागलेल्या जरांगेवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जनतेने, मराठा समाजाने, युवकांनी कोणतंही लक्ष देऊ नये. कारण जरांगेला हेच माहिती नाही की, त्याला मराठा म्हणून उभं राहायचं आहे की, कुणबी म्हणून. सरमिसळ आहे. त्यामुळे जरांगेच्या चर्चेला काहीही अर्थ नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या