Saturday, September 21, 2024
Homeनाशिक‘देशदूत’चा आज ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा

‘देशदूत’चा आज ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर आणि जिल्ह्यात अनेक शिक्षक व शैक्षणिक संस्था सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ कडून शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सपकाळ नॉलेज हब या संस्थेने स्वीकारले आहे. आज सोमवारी (दि.5) मान्यवरांच्या हस्ते विविध शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

विशेष निमंत्रित म्हणून नीती आयोग शिक्षण उपसमिती सदस्य महेश दाबक, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ उपस्थित राहणार आहेत. पलाश हॉल, गुरुदक्षिणा प्रोजेक्ट, गोखले एज्यु. सोसा., टी.ए. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेजरोड, नाशिक येथे सायंकाळी 5 पासून कार्यक्रम पार पडणार आहे. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. पुरस्काराने शिक्षकांंचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या