Sunday, October 6, 2024
Homeनगरगुरुमाऊली मंडळ बांधले सदिच्छाच्या दावणीला

गुरुमाऊली मंडळ बांधले सदिच्छाच्या दावणीला

हकालपट्टी लोकशाही विरोधी; चेअरमन सरोदे यांचा दावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत संचालकांनी गुरुमाऊली मंडळाच्या अध्यक्षांच्या आदेशाने लोकशाही मार्गाने विजय मिळवला. मात्र, हा विजय नेत्यांच्या पचनी पडला नाही. उलट मूळ गुरुमाऊली 2015 चे मंडळ सदिच्छा मंडळाच्या दावणीला नेऊन बांधले. संघ व मंडळातील सर्व प्रमुख पदे बाहेरील मंडळातून आलेल्यांना दिली आणि गुरुमाऊली मंडळ संपवले, असा आरोप शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी केला आहे.

- Advertisement -

शिक्षक बँकेचे काही संचालक व नेत्यांची गुरुमाऊली सदिच्छा मंडळातून हकालपट्टी केल्याची माहिती समाज माध्यमांवर पाहिली. त्यावर शिक्षक बँकेचे अध्यक्ष सरोदे यांनी खुलासा केला आहे. शिक्षक बँकेच्या सभासदामधून निवडून आलेल्या संचालकांचा वारंवार अपमान करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांचा जाणीवपूर्वक फोन न उचलणे, बँकेचे व्यवहाराबाबत विचारले तर, त्यांना झापने असे प्रकार सुरू होते . यातून संचालकामध्ये नाराजी वाढली. मात्र, पुढे गुरुमाऊली मंडळाच्या आदेशाने सभासद हिताचा व काटकसरीचा कारभार यापुढे सुरू राहील, असे सरोदे यांनी आश्वासित केले. दोन वर्षाच्या काळात महत्त्वाचे निर्णय संचालक बोर्डात कधीच झाले नाही. यामुळे संचालकांनी नाराज होऊन लोकशाही मार्गाने चेअरमन निवडीत सहभागी झाले.

म्हणून सर्वांना गद्दार म्हणायचे, हकालपट्टी करायची ही त्यांची जुनीच पद्धत आहे. आज हकालपट्टी करतांना मूळ गुरुमाऊली मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते किती शिल्लक राहिलेत ? निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांना किती संधी दिली याचे आत्मचिंतन होणे आवश्यक असल्याचा सल्ला सरोदे यांनी दिला. शिक्षक बँकेचे निवडणुकीत मागील संचालक मंडळांनी अतिशय चांगला कारभार करून या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यावेळी हे संचालक 14 रत्न होते. मात्र, सत्ता मिळाल्यावर त्यांनाही बाजूला केले. त्या माजी संचालकांशी कोणत्याही संचालकांनी संपर्क ठेवू नये असे, आदेश नेत्यांनी दिले होते. कार्यकर्त्यांना वापरा आणि फेकून द्या, या नीतीमुळे संघटना व मंडळ दुबळे झाले आहे. एका नेत्याच्या नातेवाईकाला अनुकंपा तत्त्वावर बँकेत नोकरीस घेण्यासाठी बँकेची कर्मचारी घटना बदलवली. त्याही बाबतीत संचालकांना अंधारात ठेवले, असा आरोप सरोदे यांनी यावेळी केला.

चर्चेतून वाद संपवण्याची अपेक्षा
शिक्षक बँकेच्या राजकारणात आता सत्ताधारी संचालक मंडळा दोन गट पडले असून 21 पैकी 11 संचालक एका गटात उर्वरित संचालक दुसर्या गटात विभागले आहेत. त्यात शिक्षक नेते बापूसाहेब तांबे गटाने 11 संचालकांसह काही नेत्यांना संघटनेतून काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता दुसरा गट देखल आक्रमक झाला आहे. यामुळे सत्ताधारी गुरूमाऊली मंडळातील वाद चांगलाच उफाळला आहे. गुरूमाऊलीच्या काही सामान्य शिक्षकांनी दोन्ही गटाने एकत्र बसून चर्चा करून हा वाद संपवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्षपदी राजेंद्र कुदनर यांची निवड केली. यापूर्वी संघाचे अध्यक्षपद बबन गाडेकर यांच्याकडे तर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद वृषाली कडलक यांना दिले आणि निष्ठावान गुरुमाऊली मंडळाचे कार्यकर्त्यावर अन्याय केला. मूळ गुरुमाऊली मंडळाचा एकही योग्य निष्ठावान माणूस त्यांना या पदासाठी लायक वाटला नाही. तेव्हा त्यांना आमच्या निष्ठेबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, या शब्दात राजकुमार साळवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या