Saturday, May 4, 2024
Homeनगरगुरूकुलचे नवले यांचा गुरूमाऊली मंडळात प्रवेश

गुरूकुलचे नवले यांचा गुरूमाऊली मंडळात प्रवेश

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

जिल्हा गुरुकुल उच्चाधिकार समितीचे ज्येष्ठ सदस्य श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षक नेते हरिदास नवले यांनी गुरुकुल मंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मंडळाचा त्याग केला असून बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळामध्ये आपल्या सहकार्‍यांसह प्रवेश केला आहे.

- Advertisement -

गुरुकुल मंडळांनी शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना असंख्य चुका केल्या आहेत. तालुक्यांनी सुचविलेली नावे डावलून आपल्या मर्जीतील उमेदवार दिले आहेत. गुरुकुल मंडळाच्या नेत्यांनी स्वतः उमेदवारी घेतल्या. काही ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुरुकुलसाठी सतत राबणार्‍या खर्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. काही तालुक्यांमध्ये उमेदवारांवर जे बालंट आले आहे त्यामुळे मंडळाची प्रतिमा मलीन झाली आहे. कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये गुरुकुलचे कार्यकर्ते मंडळ सोडण्याच्या तयारीत आहेत. श्रेष्ठींच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण गुरुकुल मंडळाचा त्याग केल्याचे आरोप हरिदास नवले यांनी केले आहेत.

अहमदनगर येथे झालेल्या गुरुमाऊली मंडळाच्या मेळाव्यामध्ये हरिदास नवले यांचे स्वागत गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे ,महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव, जिल्हाध्यक्ष अंजली मुळे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे, बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे, शरदभाऊ सुद्रिक, राजू राहाणे, अर्जुन शिरसाट, बाबासाहेब खरात, बाळासाहेब मुखेकर, आर. टी. साबळे, बँकेचे विद्यमान चेअरमन किसन खेमनर, व्हाईस चेअरमन सुयोग पवार, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब दातीर, मंडळाचे अध्यक्ष अरविंद शिर्के, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा कोथंबिरे, राजू राऊत, संजय सोनवणे, आदर्श शिक्षक रामदास ठाकर, रमेश सुपेकर, प्रमोद शिर्के, संतोष सोनवणे, राजेश इंगळे, संदीप होले आदींनी स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या