Tuesday, September 17, 2024
Homeनगरगुरूपौर्णिमा उत्सव काळात साईचरणी सव्वासहा कोटीची गुरूदक्षिणा

गुरूपौर्णिमा उत्सव काळात साईचरणी सव्वासहा कोटीची गुरूदक्षिणा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

यंदाच्या गुरूपौर्णिमा उत्सवात (Gurupurnima Festival) साईदरबारी जवळपास दोन लाख भाविकानी साईदरबारी (Sai Baba) हजेरी लावत साईचरणी तब्बल सव्वासहा कोटींची गुरूदक्षिणा अर्पण केल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. 20 ते 22 जुन दरम्यान गुरूपौर्णिमा उत्सव (Gurupurnima Festival) पार पडला. या काळातील देणगीची मंगळवारी मोजदाद करण्यात आली. यात 2 कोटी 53 लाख 29 हजार दक्षिणा पेटीत रोख स्वरूपात प्राप्त झाली. देणगी काऊंटर 1 कोटी 19 लाख 79 हजार, पी.आर.ओ. सशुल्क पास 46 लाख 73 हजार, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी. देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 1 कोटी 95 लाख 13 हजार, 8 लाख 31 हजार रूपयांचे 122. 500 ग्रॅम सोने, 2 लाख 70 हजार रूपयांच्या 4,004.600 ग्रॅम चांदीचा समावेश आहे.

उत्सव काळात संस्थानच्या प्रसादालयात 1 लाख 91 हजार भाविकांनी (Devotee) प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत 1 लाख 96 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत लाडू प्रसाद विक्रीतुन 62 लाख 31 हजार प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या विविध भक्त निवासांबरोबरच अतिरीक्त उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. साईआश्रम दोन येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्रींची निवास व्यवस्था करण्यात आली. उत्सवा दरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारण 5810 साईभक्तांनी उपचार घेतले तसेच 205 साईभक्तांनी रक्तदान केले असे सिईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या