Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमCrime News : वाहनातून गुटखा व तंबाखूची वाहतूक करणार्‍याला पकडले

Crime News : वाहनातून गुटखा व तंबाखूची वाहतूक करणार्‍याला पकडले

कोतवाली पोलिसांची कारवाई || चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मार्केटयार्ड परिसरात प्रतिबंधित केलेल्या सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून बेकायदेशीररीत्या गुटखा व तंबाखूची वाहतुक करणार्‍या तरूणावर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत संशयित आरोपीकडून एकूण तीन लाख 99 हजार 712 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

रविवारी (27 जुलै) रात्री 10.30 वाजता, कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आनंदधाम, मार्केटयार्ड परिसरात एका चारचाकी वाहनात एक इसम महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ बाळगून आहे. या माहितीच्या आधारे दराडे यांच्या आदेशाने महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी पोलीस पथक व पंचासह सदर परिसरात सापळा रचला. शोध मोहिमेदरम्यान पॉलीटेक्निक कॉलेज समोर एका संशयित वाहनाला थांबवले असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वाहनास अडवले आणि छापा टाकण्यात आला. वाहनात आढळलेल्या इसमाने आपले नाव शरद अर्जुन पवार (वय 30, रा. जाम, कौंडगाव, ता. अहिल्यानगर) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची व वाहनाची झडती घेतली असता त्याच्याकडून बंदी असलेला तंबाखूजन्य पदार्थ व इतर वस्तू मिळून आल्या. वाहनासह एकूण तीन लाख 99 हजार 712 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार सोमनाथ केकान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (अहिल्यानगर शहर) अमोल भारती, निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुगडे व गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सूर्यकांत डाके, अभय कदम, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे, राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...