Wednesday, April 30, 2025
Homeधुळेगुटखा विक्रेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; सव्वा लाखाचा माल जप्त

गुटखा विक्रेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; सव्वा लाखाचा माल जप्त

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील आर्वी येथे विक्री करण्यासाठी राज्यात प्रतिबंधीत गुटखा (Gutkha) घेवून जाणार्‍या दुचाकीस्वाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (lcb) रंगेहात पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह सव्वा लाखांचा पान मसाला व तंबाखू जप्त करण्यात आली.

- Advertisement -

महाविद्यालयीन तरुण-तरुणीला लुटणारे दोघे जेरबंद

याप्रकरणी सोनगीर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लामकानीकडून मेहेरगावमार्गे एक जण दुचाकीने (क्र एमएच 18 एबी 6829) राज्यात प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने मेहेरगावनजीक सापळा लावून संशयीत दुचाकीस्वाराला पकडले. त्याने त्याचे नाव दिनेश बारकु पाटकर (वय 38 रा.सिताराम चौक, आर्वी) असे सांगितले. त्यांच्या दुचाकीला बांधलेल्या गोणपाट उघडून पाहिले असता त्यात तंबाखू व पानमसाला आढळून आला. विमल पानमसाल्याचे 58 हजार 344 रूपयांच्या 352 पुडे, 37 हजार 780 रूपयांचे व्ही-1 तंबाखूचे 260 पुडे, लहान गोणीत विमल पानमसाल्याचे 22 पुडे व 20 हजारांची दुचाकी असा एकुण 1 लाख 16 हजार 124 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अरे बापरे ; अवकाळीचा तडाखा सुरूच राहणार!

तसेच दिनेश पाटकर यास अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोना पंकज खैरमोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया;...

0
मुंबई । Mumbai उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे...