Monday, April 28, 2025
Homeधुळेगुटख्याची तस्करी रोखली, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याची तस्करी रोखली, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे । Dhule

मध्यप्रदेशकडुन शिरपुरमार्गे मुंबईला होणारी गुटख्याची तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली. हाडाखेड शिवारात ट्रकला पकडण्यात आले. ट्रक 27 लाखांचा मुद्द्यावर जप्त करण्यात आला. तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ट्रकमधून (क्र. डी. डी.01 जे 9249) शिरपुर मार्गे मुंबईला पानमसाला व सुगंधीत तंबाकु या प्रतिबंधीत अन्नपदार्थाच्या साठ्याची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने दि.28 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हाडाखेड गावाचे शिवारात लालमाती जवळ असलेल्या रोडवरील हॉटेल विकास जवळ पेट्रोलिंग करीत असतांना संशयित ट्रकला पकडले. वाहनावरील चालक रिजवान इसरार शेख (वय 36 , रा. नुर मशिद जवळ, खजराना इंदौर, मध्यप्रदेश) यास वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत होता. त्यामुळे संशय आल्याने वाहन व चालकास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर सकाळी वाहनाची ताडपत्री उघडुन पाहीले असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत सुगंधीत नावी च्युईगींम तंबाखु, एस. एच. के. पान मसाला, शुध्द प्लस पान मसाला पदार्थ दिसुन आले.

हे पदार्थ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असल्याची खात्री झालेली असल्याने 9 लाख 72 हजार रुपये किंमतीचा शुध्द प्लस पानमसाला 5 लाख 5 हजार 440 रुपये किंमतीची नवी च्युविंग तंबाकु, 3 लाख 7 हजार 800 रुपये किंमतीचा एस एच के पानमसाला व 10 लाखांचा ट्रक असा एकुण 27 लाख 85 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक रिजवान इसरार शेख याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई संदिप पाटील हे करीत असुन ट्रक चालकास गुन्हयात अटक करुन माल हा कोठुन आणला व कोणास विक्री करणार होता, तसेच मुख्य आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

ही करवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सुरेश शिरसाठ, पोसई संदिप पाटील, असईपजयराज शिंदे, पोहेकॉ जाकीरोद्दीन शेख, पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोकॉ संतोष पाटील, योगेश मोरे, राजेश्वर कुवर यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...