धुळे dhule। प्रतिनिधी
इंदूर येथून शिरपूरकडे येणारा सुंगंधीत तंबाखूने भरलेल्या आयशर ट्रकला शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाने शिताफीने पकडले. चालकाला ताब्यात घेत 20 लाखांचा ट्रक व त्यात 19 लाख 74 हजारांची सुगंधीत तंबाखु असा एकुण 39 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्लॅस्टीक फिल्म मालाच्या आड ही गुटखा तस्करी केली जात होती.
राष्ट्रीय महामार्ग क्र.3 ने इंदूरकडुन शिरपूरकडे येणार्या आयसर वाहनात (क्र. यु.पी.53/इ.टी.0241) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखुचा माल भरलेला असल्याची गुप्त माहिती शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आगरकर यांना आज दि. 27 रोजी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास मिळाली. त्यानुसार त्यांनी पोसई संदिप मुरकुटे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोसई मुरकुटे यांनी डी.बी.पथकासह शहादा फाटा, कळमसरे शिवारात (ता.शिरपूर) सापळा लावला. पहाटे तीन वाजता इंदूरकडुन शिरपूरकडे येणार्या संशयीत आयसर वाहनाला (क्र.यु.पी.53/ इ.टी.0241) शिताफीने पकडले. वाहनावरील चालकाने त्याचे नाव जमाल अली अहमद (वय 48 रा. नारायचा जाफरगंज ता. बिंडकी जि. फतेहपुर हासवा, उत्तर प्रदेश) असे सांगितले. वाहनात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोश्याला भोला छाप सुगंधीत तंबाखुचा माल भरलेले आढळून आला. त्यामुळे चालकाला ताब्यात घेत पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टीक गोणपाटात असलेले 9 कार्टुन व पांढर्या रंगाचे प्लॉस्टीक गोणपाटात 41 कार्टुन असे एकुण 50 कार्टुन मिळुन आले.
19 लाख 74 हजारांची सुबंधीत तंबाखू आणि 20 लाखांचे आयसर वाहन असा एकुण 39 लाखा 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व सुरक्षा अधिकार्यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात येवुन वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती फिर्यादी होवुन गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोउनि संदिप मुरकुटे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर, अमित रनमळे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटु साळुंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांच्या पथकाने केली आहे.