Saturday, October 3, 2026
Homeक्राईमCrime News : गुटख्याची वाहतूक करणार्‍या तरूणाला पकडले

Crime News : गुटख्याची वाहतूक करणार्‍या तरूणाला पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची दुचाकीवरून चोरटी वाहतूक करणार्‍या एका तरूणाला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेरअली आरीफ तांबोळी (वय 25, रा. व्यापारी मोहल्ला, नालबंद खुंट, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बुधवारी (25 मार्च) दुपारी तीन वाजता सिध्दीबाग परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 42 हजार 292 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिध्दीबागेकडून जगुभाई तालीम कडे जाणार्‍या रस्त्यावर संशयित इसम शेरअली आरीफ तांबोळी हा दुचाकीवरून जात होता.

- Advertisement -

तोफखाना पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे विमल, हिरा, डायरेक्टर असा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूचे पाकीट मिळून आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी शरीरास अपायकारक असलेला हा साठा तो विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुटख्यासह दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...