Tuesday, May 21, 2024
HomeUncategorizedशहाद्यात पुन्हा गुटखा पकडला

शहाद्यात पुन्हा गुटखा पकडला


शहादा | दि.५| ता.प्र.

शहरानजीक असलेल्या उंटावद गावाजवळ तिखोरा ते लोणखेडा रस्त्यावर शनिवारी दुपारी १६ हजार ६५४ रुपयांचा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विमल गुटखा,पाच हजार रुपये किंमतीचा अँड्रॉइड मोबाईल व एक विना नंबर प्लेट मोटारसायकल असा एकूण ४६ हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फिरोज आरिफ धणानी याच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी शहरातील एका विमल गुटखा तस्कराचा नातेवाईक असल्याचे समजते.

- Advertisement -


याबाबत पोलीस पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीक असलेल्या उंटावद गावा जवळील तिखोरा ते लोणखेडा रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित फिरोज आरिफ धनानी (वय ३४) रा.गरीब नवाज कॉलनी शहादा हा राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला विमल गुटखा तंबाखू, पानमसाला अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगतांना मिळून आला.


पोलीस शिपाई सचिन कापडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी फिरोज धनानी याचा विरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई अभिजित अहिरे करीत आहेत. दरम्यान, शहर व तालुक्यात अवैध धंद्यांवर संक्रांत असताना राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित विमल गुटखा विक्री व वाहतूक सुरूच असल्याचे आठ दिवसापासून सुरू असलेल्या कारवाई वरून दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या