Wednesday, May 29, 2024
HomeUncategorizedमध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा लाखोंचा गुटखा पकडला

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा लाखोंचा गुटखा पकडला

मलकापुर – प्रतिनिधी malkapur

मध्यप्रदेशातून (mp) होणारी बेकायदा गुटख्याची (Gutkha) वाहतूक रोखण्यात मलकापुर पोलिसांना (police) यश आले आहे. मालवाहु बोलेरो मधून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून वाहनासह राज्यात बंदी असलेला विमल गुटख्यासह सुमारे १६ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

शे.इतराम शे.हुसेन वय २४ रा.तेलीपुरा बुऱ्हानपुर, शे.सलमान शे.अनवर २० रा.तेलीपुरा बुऱ्हानपुर व अरुण मधुकर राठोड ३२ रा. छोटी बोरगाव बुऱ्हानपुर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

महाराष्ट्र राज्यात प्रतीबंदीत असलेल्या विमल गुटख्याची मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी १२ जुलै रोजी मुंबई-नागपूर महार्गावरील मलकापुर नजीकच्या उड्डाणपुलावर सापळा लावण्यात आला होता. पोलिसांनी मालवाहु बोलेरो एमएच २८ बी बी २८६० ही वाहन अडवून तपासणी केली असता या वाहनात महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून विमल गुटखा खरेदी व विक्रि करत असल्याची कबुली दिली. पोलिस तपासात बोलेरोमध्ये सुमारे ११ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला आहे. याप्रकरणी मलकापुर शहर पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, मलकापुर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पी एस आय अशोक रोकडे, पोलीस पो.काॅ अमोल शैले,शरद मुंडे,आनंद माने,राठोड आदींच्या पथकाने केली. मलकापुर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या