नाशिक । प्रतिनिधी Nashik
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतुन निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने शहरात धडक कारवाई केली असून तब्बल ७ लाख ४४ हजार ९३२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखु जप्त करून गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
भाबड व्हिलाचे बाजुला, कुमावतनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी नाशिक येथे रविंद्र जगन्नाथ ब्राम्हणकर उर्फ रवि (वय ४२, रा- फ्लॅट नं ५, मोरया अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, ड्रिम कॅस्टल बिल्डिंगजवळ, नाशिक), विकास वाल्मीन भारस्कर (वय ३३, रा- रो हाउस देव अमृत सोसायटी रो हाउस नं १४०, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी नाशिक) यांच्या ताब्यात ६,२७,८२२ रूपये किंमतीचा व सचिन रमेश कोठावदे (वय- ३८, रा – प्लॉट नं १००, विघ्नहर्ता रो हाऊस, शरदचंद्र मार्केटचे मागे, पेठ रोड, पंचवटी नाशिक) यांच्या ताब्यात १,१७,११० रूपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असतांना विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना व वाहतुक करतांना मिळुन आल्याने प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु असा एकुण ७,४४,९३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.