Saturday, July 27, 2024
HomeनाशिकSinnar Crime News : वावीत हजारोंचा गुटखा जप्त

Sinnar Crime News : वावीत हजारोंचा गुटखा जप्त

वावी | वार्ताहर | Vavi

तालुक्यातील वावी (Vavi) येथील एका किराणा दुकानातून तब्बल १२ हजारांचा गुटखा जप्त (Gutkha Seized) करण्यात वावी पोलिसांना (Vavi Police Station) यश आले आहे. पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत सदर माहिती मिळाली होती. त्यांनतर लोखंडे यांनी तात्काळ वावी येथील किराणा दुकानदार विजय उर्फ विलास निवृत्ती गायकवाड हे चोरीच्या माध्यमातून गुटखा विकत असताना त्यांना रंगेहाथ पकडले…

- Advertisement -

Monsoon Session : “राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला”; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वावी पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन लोखंडे यांना मंगळवार (दि. ०८ ऑगस्ट २०२३) रोजी गोपनिय माहीती मिळाली होती.

यानंतर वावी गावातील साई चैतन्य किराणा जनरल स्टोअर्स येथे लोखंडे यांच्यासह पोउपनि बी.आर.आहेर, पो. ह. सतीश बैरागी, प्रवीण कुरवडे, शहाजी शिंदे, शैलेश शेलार यांनी जाऊन दुकानाची (Shop) झडती घेतली असता दुकानात विविध कंपन्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू व पानमसाला असा मुद्देमाल मिळून आला.

Nashik Crime News : फरारी भामटा जेरबंद;
खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

त्यात ५ हजार ७६० रुपये किंमतीच्या प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे ४५ पाकिटे, १ हजार ३५० रुपये किमंतीचा २-१ जाफराणी तंबाखुचे ४५ पकिटे, १ हजार ५६० रुपये किमंतीचा हिरा पान, ३९० रुपये किमंतीचा रॉयल, ७१७ तंबाखुचे पिवळ्या रंगाची १३ पाकिटे, २ हजार ७७२ रुपये किमंतीचे केशरयुक्त विमल सुगंधित पान मसाल्याची १४ पाकिटे, ३०८ रुपये किंमतीचा V.१ जर्दा तंबाखूचे हिरव्या रंगाचे १४ पाकिटे, असा एकूण १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) जप्त केला.

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन

दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी विलास निवृत्ती गायकवाड (वय ३९) यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३२८,१८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करुन त्यास अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. आर. आहेर व पो.कॉ. शैलेश शेलार करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

…म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या