Tuesday, April 29, 2025
HomeनाशिकNashik Crime News : कारसह साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

Nashik Crime News : कारसह साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

मालेगाव | Malegaon

येथील मालेगाव-नामपूर मार्गावरील (Malegaon-Nampur Route) वडनेर शिवारात जिल्हा पोलीस प्रमुखांचे विशेष पथक व वडनेर खाकुर्डी केलेल्या कारवाईत कारसह साडेतीन लाखांचा गुटखा (Gutkha) पुड्यांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे…

- Advertisement -

Nashik Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूरात ड्रग्जचा कारखाना
उद्ध्वस्त, ‘इतक्या’ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

शहरात मोठ्या प्रमाणात वाहनातून अवैद्य गुटखा पुड्यांचा साठा विक्रीसाठी आणला जात आहे. या संदर्भात माहिती मिळाल्याने पोलीस पथकातर्फे (Police Team) शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर गस्त घालत लक्ष ठेवले जात आहे. नामपूर भागातून कारमधून गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी वडनेर शिवारात सापळा लावला होता.

यावेळी मारुती व्हॅन भरधाव वेगाने येत असल्याचे दिसताच पोलिसांनी थांबून तिची तपासणी केली असता दोन लाख ५४ हजाराचा सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा पुड्यांचा साठा दिसून आल्याने पोलिसांनी कारसह जप्त केला.

वडाळा गावात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई 

दरम्यान, या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या निहाल मोहम्मद युसुफ अन्सारी रा. रमजान पुरा व मुद्दशीर हुसेन मुजफ्फर हुसेन रा.दयाने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध वडनेर खाकुडी पोलीस ठाण्यात (Khakudi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

देशदूत संवाद कट्टा : प्लास्टिकचा भस्मासुर कसा रोखणार?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....