Tuesday, April 1, 2025
Homeनंदुरबारशहादा येथे पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त

शहादा येथे पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त

शहादा । ता.प्र. Shahada

महाराष्ट्रात (maharastra) वाहतूक व विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला विमल गुटखा व पान मसाला अवैधरित्या शहाद्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणार्‍या दोघा विमल तस्करांना शहादा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून चार चाकी वाहनांसह सुमारे 4 लाख 82 हजार रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि.31 रोजी रात्री दहा वाजता शहादा तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक करण्यात आली. याप्रकरणी नंदुरबार येथील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघा विमल तस्करबंधूंना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षापासून राज्यात तंबाखूमिश्रित विमल गुटखा व सुगंधित पान मसाला वाहतूक व विक्रीवर राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. तरीदेखील मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात या गुटख्याची तस्करी व विक्री राजरोजपणे सुरू असून सर्रासपणे शहरात विक्री केली जात आहे. त्यामुळे गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. दि.31 रोजी शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. त्यानुसार रात्री दहा वाजता शहादा तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक उपनिरीक्षक छगन चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दिनकर चव्हाण, किरण पावरा, संदीप लांडगे, भरत उगले यांनी सापळा लावला असता एम.एच.39 ए.बी.1960 क्रमांकाचे पांढर्‍या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. त्या वाहनास थांबवून तपासणी केली असता प्रतिबंधित तंबाखू मिश्रित विमल गुटखा व पान मसाला असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने या वाहनातील सुमारे 2 लाख 82 हजार 480 रुपयाचा विमल गुटखा व 2 लाख किमतीचे चार चाकी वाहन असा सुमारे 4 लाख 82 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघा विमल तस्करी करणार्‍या बंधूंना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पोलीस शिपाई दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम 188, 272, 273, 328 व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26,( 2) (4) 30(2) ए प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ready Reckoner Rate : रेडी रेकनर दरात वाढ; घरे आणि मालमत्ता...

0
नाशिक | Nashik गेल्या तीन वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात (Ready Reckoner Rate) राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, यावेळी राज्यातील...