Wednesday, October 21, 2026
HomeनगरRahuri : गुवाहाटीला जाणारा 12 लाखांचा कांदा ट्रकसह गायब

Rahuri : गुवाहाटीला जाणारा 12 लाखांचा कांदा ट्रकसह गायब

उंबरे |वार्ताहर| Umbare

गुवाहाटी येथील व्यापार्‍याला पोहोच करण्यासाठी दिलेल्या 12 लाख रुपये किमतीच्या 575 कांद्याच्या गोण्यासह ट्रक गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांबोरी येथील कांदा व्यापारी अक्षयकुमार सुरेशचंद मुथ्था यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. कांद्याच्या रकमेसह डिझेल खर्चासाठी दिलेली रोख रक्कम मिळून एकूण 12 लाख 16 हजार 400 रुपयांचा अपहार झाल्याने कांदा व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली. अक्षयकुमार मुथ्था यांची वांबोरी आणि राहुरी येथे मनोहर ट्रेडिंग कंपनी या नावाने कांदा खरेदी-विक्रीची दुकाने आहेत. गुवाहाटी येथील चांदसरी मार्केटमधील जावेदभाई यांनी त्यांच्याकडे 30 टन कांद्याची मागणी केली होती.

- Advertisement -

हा कांदा गुवाहाटी येथे पोहोचविण्यासाठी मुथ्था यांनी पिंपळगाव बसवंत येथील न्यू बंगाल ट्रान्सपोर्टचे मालक सुजित यादव यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार यादव यांनी आरजे 14 जीपी 5779 क्रमांकाचा ट्रक उपलब्ध करून दिला. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ट्रकचालक वारिश दिन मोहम्मद खान आणि त्याच्यासोबत मोहम्मद इरशाद उसमान खान हे वांबोरी येथे आले. ट्रान्सपोर्ट मालकाने पाठविल्याची माहिती त्यांनी दिल्यानंतर मुथ्था यांनी संबंधित मालकाकडून खात्री केली. त्यानंतर वांबोरी येथील दुकानातून ट्रकमध्ये कांद्याच्या 464 गोण्या, तर राहुरी मार्केट यार्डमधून आणखी 111 गोण्या भरण्यात आल्या. अशा एकूण 575 गोण्या ट्रकमध्ये भरून तो गुवाहाटीकडे रवाना झाला. ट्रक रवाना करताना मुथ्था यांनी चालकाच्या आधारकार्डाची आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या वाहन परवान्याची छायांकित प्रत घेतली.

तसेच डिझेल खर्चासाठी चालकाला 16 हजार 400 रुपये रोख दिले, तर न्यू बंगाल ट्रान्सपोर्टच्या मालकाला ऑनलाइन पद्धतीने 83 हजार 600 रुपये पाठविले.दरम्यान, 15 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील जावेदभाई यांना ट्रकचालकाने फोन करून ट्रकचे टायर खराब झाल्याचे सांगितले आणि 40 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार जावेदभाई यांनी हरियाणातील सदाम हुसेन यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर 40 हजार रुपये पाठविले. त्यानंतर चालकाने पुन्हा डिझेलसाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कमही जावेदभाई यांनी चालकाने पाठविलेल्या स्कॅनरद्वारे पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र, 17 ऑक्टोबरपर्यंत ट्रक गुवाहाटी येथे पोहोचला नाही. त्यानंतर मुथ्था यांनी ट्रकचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद येऊ लागला. त्यामुळे ट्रकमधील कांदा गंतव्यस्थानी पोहोचविण्याऐवजी चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने कांदा व रोख रकमेचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करत मुथ्था यांनी ट्रकचालक वारिश दिन मोहम्मद खान आणि त्याच्यासोबत असलेल्या मोहम्मद इरशाद उसमान खान यादोघांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्या विरूद्ध गु.र.न 1179/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 316(3), 3(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे तपास पो.नि. रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अशोक झिने करीत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही,...