Saturday, June 14, 2025
Homeजळगावदूध संघाच्या निवडणूकीसाठी अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत

दूध संघाच्या निवडणूकीसाठी अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ (Former NCP MLA Dilip Wagh) हे आमच्याकडून बिनविरोध (Elected unopposed) निवडुन आले आहेत. वाघ यांच्यासह अर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (Half NCP) आमच्याकडे (us) असल्याचा दावा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Sanitation and Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

भाजपा शिंदे गटाचा आ. खडसेंना धक्का

भाजप व शिंदे गट व महाविकास आघाडी अश्या दोन पॅनलमध्ये जिल्हा दूध संघाची निवडणुक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ आमच्या पॅनलकडे आले आहेत. त्यांच्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने वाघ यांच्या माध्यमातून आमच्या पॅनलची एक जागा बिनविरोध झाली आहे. वाघ यांच्यासह संजय पवार, निकम, झांबरे हे देखील हे देखील राष्ट्रवादीचे असून अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडे असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. आ. एकनाथ खडसे यांनी मंत्री असतांना दुध संघाची निवडणुक लढविली होती, आता आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत. त्यांनी अनेकदा लढविली मी पहिल्यांदाच लढवतोय, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला.

या मुली कोणा ‘आफताब’च्या जाळ्यात तर नाही ?जळगावच्या दूध संघाच्या निवडणूकीत अशा रंगतील लढती

खाल्लेले तुप- लोणी आता निघेल- आ. मंगेश चव्हाण

आमदार एकनाथ खडसे यांनी खूप तुप-लोणी खाल्ले आहे, ते पैसे आता निवडणुकीत निघतील असा चिमटा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला. आम्ही बिनविरोधसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, यांनी जिल्हा बँक निवडणुकीत केलेल्या विश्वासघातामुळेे खडसे नकोच ही भूमिका आम्ही घेतल्याची माहिती देखील मंगेश चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि...