जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड (Jamkhed) तालुक्यातील हाळगाव (Halgav) येथे एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह एका शेततळ्यात तरंगताना आढळून (Farm Pond DeadBody) आले आहेत. सदर महिला व मुले 10 जुलै पासुन बेपत्ता होते. ही आत्महत्या की घातापात याची परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे.
चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय 31) दिपाली बबन पाचारणे (वय 11) व राजवीर बबन पाचारणे (वय 8, रा. सर्व हळगाव, ता. जामखेड) अशी या घटनेतील मृतांंची नावे आहे. पोलीसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) माहिती दिली की, हाळगाव येथील शेतकरी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या गट नंबर 434 मधील शेतातील शेततळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह (Dead Body) पाण्यामध्ये तरंगत आहेत. हे तीघेही हळगाव गावातील आहेत. मिळालेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप निषेधार्ह – किसान सभा
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी पोहोचले. गावकर्यांच्या मदतीने सदर मृतदेहांना शेततळ्यातून बाहेर काढले. दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या मृतदेहांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. सदर महिला व मुले बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार मंगळवारीच (दि. 11) रोजी जामखेड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.
‘लव्ह जिहाद’च्या घटनेने कोपरगाव हादरले