Monday, June 24, 2024
Homeनगरपोलिसांचा हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

पोलिसांचा हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील शिंगणापूर (Shingnapur) येथील नारंदा नदीच्या कडेला काटवणात काही इसम गावठी हातभट्टीची दारू (Hand Furnace Alcohol) तयार करीत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली असता या ठिकाणी कारवाई केली असता तीन ठिकाणाहून 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला असून चार आरोपीं विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या चार आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेणार

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी (Kopargav Police) शिंगणापूर शिवारातील नारंदा नदीच्या काटवनात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू बनविणार्‍यांवर कारवाई केली. मंदाबाई बळीराम आहेर रा. मनाईवस्ती, शिंगणापुर या महिलेकडे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे 32 हजार रुपयांचे कच्चे रसायन मिळुन आले. ते पंचासमक्ष नष्ट (Destroyed) केले. त्याबाबत महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनंदा संजय धराडे यांच्या फिर्यादीवरुन सदर महिलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

राहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक; वाचा भाव

या हातभट्टीशेजारीच मनिषा संतोष सोनवणे हिच्याकडे गावठी हातभट्टीची दारु (Hand Furnace Alcohol) व कच्चे रसायन असा एकूण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो पोलिसांनी नष्ट केला. याच परिसरात भाउराव सोमनाथ पवार आणि नानासाहेब कारभारी गायकवाड यांच्याकडून तीस हजार रुपयांची हातभट्टीची दारु व रसायन मिळुन आले. आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पो.नि. प्रदिप देशमुख, पोउपनि भरत दाते, पो.कॉ. गणेश वशिष्ट काकडे, संभाजी शिंदे, यमनाजी सुंबे, सुनंदा धराडे यांनी केली.

झेडपी, पालिका शाळांचे खाजगीकरण; आता शाळाही दत्तक !संगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध लॉजिंगला अच्छे दिन

- Advertisment -

ताज्या बातम्या