Monday, June 24, 2024
Homeनाशिकदिव्यांगांची अनोखी प्रेमकहाणी; लग्न सोहळ्याची सर्वदूर चर्चा

दिव्यांगांची अनोखी प्रेमकहाणी; लग्न सोहळ्याची सर्वदूर चर्चा

नाशिक । Nashik

- Advertisement -

आपल्या सभोवताली दररोज अनेक प्रेमविवाह (Love Marriage) होत असतात. परंतु नुकताच एक आगळा वेगळा विवाह सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluk) उजनी (Ujni) गावात संपन्न झाला असून या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे…

यातील वराचे नाव जालिंदर सापनर (Jalindar Sapner) असे असून वधूचे नाव सारिका रणपिसे (Sarika Ranpise) असे आहे. हे दोघे जन्मतच दिव्यांग (disabled) असले तरी दोघांनाही शिक्षणाची (Education) ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनी ठेवली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने या दोघांचा शिक्षणाचा रोजचा प्रवास सुरु झाला होता. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दररोज कुणी शाळेत सोडणे अशक्य होते. मात्र अशाही परिस्थिती या दोघांनी हार न मानता दररोज चप्पल हातावर घेवून सरपटत सरपटत शाळेत जाण्याचा निश्चय केल्याने त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

तसेच हे दोघे शाळेत शिकत असतांना त्यांची प्रथम ओळख झाली. त्यानंतर मैञी झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.यानंतर हे दोघे विवाह बंधनात अडकले. या दोघांनी ३० जून २०२२ रोजी अगोदर कोर्ट मॅरेज (Court marriage) केले. तर थाटामाटात लग्न करण्याची त्या दोन्हीही कुटुंबांची परिस्थिती नसल्याने अगदी साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला.

दरम्यान, या दोघा दिव्यांगांना आशीर्वाद देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आदोंलनाचे अरुण पाचोरकर आणि इतर नातेवाईक, दिव्यांग मंडळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या