हंसिका मोटवानी आजघडीला साऊथ सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा.
पण तिने आपल्या करिअरची सुरुवात २००१ साली एकता कपूरच्या मालिकेमधून केली होती.
हंसिकाने बाल कलाकार म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बालकलाकार म्हणून तिला खूप पसंत केले गेले आणि तिला चाहत्यांचे खूप प्रेमही मिळाले.
छोट्या पडद्यावरील ‘सोनपरी’ या मालिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.
हंसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहात असते.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हंसिका बऱ्याच वेळा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
हंसिका दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून बॉलिवूडमध्येही तिचा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
हंसिकाने हिमेश रेशमियाच्या आप का सुरुर या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर हंसिका गोविंदासोबत ‘मनी है तो हनी है’ चित्रपटात दिसली होती.