Saturday, May 4, 2024
Homeनगरहनुमान जन्मोत्सवानिमित्त नगर शहरात भाविकांची मंदिरात गर्दी

हनुमान जन्मोत्सवानिमित्त नगर शहरात भाविकांची मंदिरात गर्दी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा (Corona) प्रादुर्भाव संपल्याने दोन वर्षानंतर नगर शहरात (Nagar city) हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आज मोठ्या उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. दरवर्षी सर्व मंदिरांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) पहाटेपासूनच भाविकांची लगबग सुरू असते. प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव पहाटे शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई (Attractive electric lighting) करण्याबरोबरच यावर्षी भोंग्यांवर हनुमान चालीसा पाठही लावण्यात आला.

- Advertisement -

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा (Sarjepura) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीस महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पुजा करण्यात आली. बरोबर सुर्यदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून व पाळणा हलवून संकटमोचन हनुमान की जय, जय श्रीराम… जय श्रीराम… च्या जयघोषात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला.

हनुमान जयंती (Hanuman Jayanti) निमित्त सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, तर मंदिरा बाहेरही आकर्षक विद्दुत रोशनाई करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी कन्हैय्यालाल परदेशी यांच्या मार्गदर्शना खाली जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात सुरु झालेल्या सामुहिक हनुमान चालीसा पाठाचाही उत्साहात सांगता करण्यात आली, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या