Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाHappy Birthday - एम. एस. धोनी

Happy Birthday – एम. एस. धोनी

भारतीय क्रिकेट संघात एक वेळ अशी होती की संघात शहरातील मुलांचा भरणा अधिक होता कारण शहरात मिळणाऱ्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि शहरातील क्रिकेट साठी मिळणारे पोषक वातावरण. अनेक ग्रामीण भागातील मुले भारतीय क्रिकेट संघात स्थान पक्के करू शकत नव्हते. कदाचित एक प्रकारची भीती त्या मुलांमध्ये होती. महेंद्रसिंग धोनी याने एक असे स्वप्न बघितले की त्याकाळी ते स्वप्न बघण्याची अनेकांना भीती वाटायची. ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचे.

- Advertisement -

झारखंडमधील रांची जवळलील एका छोट्याशा गावातून येऊन धोनीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघितले आणि ते धाडसाने पूर्ण केले. धोनीने अगदी लहान वयातच क्रिकेट मधील देव समजल्या जाणाऱ्या मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकर ला आपले प्रेरणास्थान मानले.

भारतीय रेल्वेमध्ये टी.सी म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्याने केलेल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवला.

धोनी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. जगभरातील अनेक चाहत्यांची त्याच्या याच स्वभावाचे अनुकरण करण्याची इच्छा असते. भारतीय क्रिकेट संघ अनेक कठीण परिस्थितीत असताना त्याने हसत हसत संघाला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे.

त्याच्या याच स्वभावामुळे त्याने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून काम केले. आणि ज्याला आपले प्रेरणास्थान मानले होते त्या सोबत खेळण्याचे स्वप्न साकारच केले नाहीतर त्याचाही कर्णधार बनला.

२००७ साली झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप मध्ये त्याने संघाला विजय मिळून दिला. तेव्हापासून युवा पिढीने त्याला डोक्यावर घेतले. त्यानंतर त्याने संघाला अनेक विजय मिळवून देत आपली घौडदौड चालू ठेवली.

त्यानंतर बॉलिवूडने त्याच्या आयुष्यावर “धोनी – द अनटोल्ड स्टोरी” हा चित्रपट बनवत त्याच्या अलौकिक बुद्धिमत्ता, चिकाटीची माहिती संपूर्ण जगाला करून दिली.

महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून त्याचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहे. तिने फोटो सोबत लिहाल आहे, ” तू आजच्या दिवसांसोबत एक वर्ष आणखी मोठे, अधिक हुशार आणि आणखी गोड व्हा. खरच.! तुम्ही असे माणूस आहात की तुम्ही फक्त शुभेच्छा आणि भेटवस्तु ने प्रेरित होणार नाही. त्यामुळे केक कापून आणि मेणबत्या पेटवून आजचा दिवस साजरा करूया ! Happy Birthday Husband”

धोनीच्या वाढदिवसानिमित्त ब्राव्हो ने खास गाणे प्रदर्शित केले आहे. त्याने त्या गाण्यात धोनीने जिंकलेल्या तीनही आयआयसी स्पर्धांचा उल्लेख आहे.

गाणे पाहा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रपती

President Droupadi Murmu: ‘न्यायालयीन आदेशांद्वारे वेळेची मर्यादा घालता येते का?’; राष्ट्रपती...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षावर मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. राज्यपाल विधेयकांना अनिश्चित कालावधीसाठी रोखू...