देशाची पहिली सुपरमॉडेल “मधू सप्रे” आज वाढदिवस. तिचा जन्म 14 जुलै 1971 रोजी नागपूर येथे झाला होता.
मधु सप्रे ही कला विश्वात एक बोल्ड मॉडेल म्हणून ओळखली जाते. मॉडेलिंग करण्याअगोदर तिची इच्छा अथेलिक बनण्याची होती.
90 च्या दशकात फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांनी मधु 19 वर्षाची असताना तिचे फोटोशूट केले आणि भारतीय कलाविश्वाला सुपर मॉडेल दिली.
1992 मध्ये मधु मिस इंडिया बनली. त्यानंतर मिस युनिवर्स साठी तिची निवड झाली. मिस युनिवर्स मध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्या स्पर्धेत ती तिसऱ्या स्थानी राहिली.
मिस इंडिया झाल्यानंतर तिचे अफेयर मिलिंद सोमण या सोबत राहिले. त्या दोघांनी 1995 मध्ये टफ शूज या कंपनीच्या जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केले.
टफ शूज’च्या जहिरतीवरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्या सालीच ऑगस्ट मध्ये मुंबई पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ती अखेर कैटरीना कैफ आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत “बूम” या चित्रपटात दिसली. त्यानंतर ती चित्रपट जगतापासून दूर झाली.