Monday, July 22, 2024
HomeमनोरंजनAmitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागचं कारण तुम्हाला...

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज (११ ऑक्टोबर) ८० वा वाढदिवस आहे.

- Advertisement -

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या नावाला जे वलय प्राप्त झालं आहे ते पाहून थक्क व्हायला होतं.

अमिताभ बच्चन यांचा उत्साह नेहमीच पाहण्यासारखा असतो. पण अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं तर एक बाब प्रत्येक ठिकाणी समान असते आणि ती म्हणजे त्यांची फ्रेंच कट दाढी. ज्याची अनेकांनी कॉपी केली आहे. पण अमिताभ बच्चन कायम अशी फ्रेंच कट दाढीमागे देखील एक मजेशीर किस्सा आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रामध्ये ‘अक्स’ सिनेमाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांना फ्रेंच कट दाढीमध्ये दाखवायचे होते.

‘अक्स’ हा राकेश यांचा देखील पहिला सिनेमा होता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना हे कसे सांगायचे असा प्रश्न राकेश यांना पडला होता. त्याबद्दल राकेश यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले की, ‘ १९९८ मध्ये थंडीचे दिवस होते. अमितजींना ‘अक्स’सिनेमाचे स्क्रिप्ट दिले. हे स्क्रिप्ट ते दिल्लीला जाताना विमानात वाचणार होते.

स्क्रिप्ट वाचून ते काय प्रतिक्रिया देणार, याची मला उत्सुकता होती आणि त्याचबरोबर मी नर्व्हसही होतो. अमिताभ यांनी मला विचारले, ‘तू जेव्हा स्क्रिप्ट लिहिले तेव्हा तू काय पित होतास…’ मी त्यांना उत्तर दिले, ‘कोक आणि रम घेतली होती…’

त्यानंतर अमिताभ मला म्हणाले चल आपण हे करू या… त्यानंतर मी त्यांना फ्रेंच कटबद्दल सांगितले. हा लूक त्यांना खूपच आवडला त्यामुळेच इतके वर्षे हा लूक त्यांनी कायम ठेवला आहे…’

- Advertisment -

ताज्या बातम्या