Wednesday, May 29, 2024
HomeमनोरंजनHappy Birthday Kajol : ४९ वर्षांची झाली अजय देवगणची पत्नी, असा आहे...

Happy Birthday Kajol : ४९ वर्षांची झाली अजय देवगणची पत्नी, असा आहे ‘काजोल’चा फिल्मी प्रवास

आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणारी काजोल आज ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शालेय जीवनातच तिला पहिला ब्रेक मिळाला. तिने जरी बालकलाकाराच्या रुपात करिअरला सुरुवात केली असली तरी ती आज ज्या शिखरावर आहे ते तिच्या कष्टाने.

साधी सिंपल दिसणा-या काजोलचा जन्म बंगाली-मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील शोमू मुखर्जी सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माते होते. तसेच, तिची आई तनुजा प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री होत्या. काजोलला तनिषा ही धाकटी बहीणदेखील आहे.

- Advertisement -

काजोलचे सुरुवातीचे शिक्षण पंचगनीच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कुलमध्ये झाले. अभ्यासात हुशार असलेली काजोल डान्स आणि अभिनयातही बालपणापासून तल्लख होती. ती लहान असतानाच तिचे वडील त्यांच्यापासून दूर झाले होते. काजोल सुरुवातीपासूनच तिच्या आईच्या जवळची होती. ती शिक्षणासाठी बोर्डिंग शाळेत राहत असल्याने आई-वडीलांच्या बिघडत्या नात्याचा तिच्यावर जास्त परिणाम झाला नाही.

१९९२ मध्ये आलेला ‘बेखुदी’ हा काजोलचा पहिला सिनेमा होता. या सिनेमावेळी काजोल केवळ १६ वर्षांची होती. १९९३ मध्ये तिला त्यावेळच्या इंडस्ट्रीचा नवीन अभिनेता शाहरुख खानसह ‘बाजीगर’ सिनेमा करण्यासाची संधी मिळाली. सिनेमा सुपरहिट ठरला आणि काजोलच्या करिअरला कलाटणी मिळाली. साधी दिसणा-या काजोलने अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरस्टार सिनेमे दिले.

केवळ १६ व्या वर्षी करिअरला सुरुवात करणारी काजोलने एकापाठोपाठ अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. काही वर्षांतच ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली. २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये अजय देवगणसह लग्न करून काजोलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

दोघांची लव्हस्टोरी ‘गुंडाराज’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. अजयच्या सांगण्यानुसार, आमच्या प्रेमात आकर्षण नव्हे खरे प्रेम दडलेले आहे. आजच्या स्थितीला दोघांचे विवाहित आयुष्यात आनंदी आहे. त्यांना मुलगा युग आणि मुलगी न्यासा ही दोन मुले आहेत.

काळासोबत तिच्या कारकीर्दीत यश मिळवलेली अभिनेत्री काजोल आज कोट्यवधींच्या निव्वळ संपत्तीची मालक आहे. Caknowledge.com च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये काजोलची एकूण संपत्ती $ २४ दशलक्ष आहे. काजोल एका महिन्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावते आणि तिचे वार्षिक उत्पन्न १२ कोटींपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, काजोल एका चित्रपटासाठी सुमारे ४ कोटी रुपये घेते. ते ब्रँडच्या इंडोर्समेंटनातून भरपूर कमावते.

काजोल मुंबईत एका आलिशान घरात राहते. असे म्हटले जाते की तिचे घर मुंबईतील सर्वात क्लासिक घरांपैकी एक आहे. एवढेच नाही तर काजोल महागड्या वाहनांची (Kajol Cars Collection) खूप आवडते. अजय देवगण आणि काजोल हे Rolls Royce Cullinan, Audi A5, Mercedes-Benz S-Class, Maserati आणि BMW X7 सारख्या वाहनांचे मालक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या