Tuesday, November 26, 2024
HomeमनोरंजनHappy Birthday Priyanka Chopra: वडील सैन्यात डॉक्टर, बिहारमध्ये शिक्षण प्रियांका चोप्राबाबत माहिती...

Happy Birthday Priyanka Chopra: वडील सैन्यात डॉक्टर, बिहारमध्ये शिक्षण प्रियांका चोप्राबाबत माहिती नसलेल्या काही गोष्टी…

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)चा आज वाढदिवस. ती ४० वर्षांची आज झाली आहे. प्रियांकाने वयाच्या 18 व्या वर्षी मिस वर्ल्ड’चे जेतेपद जिंकले. मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली छाप पाडली आहे.

प्रियांका चोपडा मूळ बिहार राज्यातील आहे. ती 13 वर्षांची असताना ती तिच्या मावशीसोबत अमेरिकेत(America) राहत होती. तिने तिथे शाळेत प्रवेश घेतला. अमेरिकेत तिला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. याबाबत एका मुलाखतीमध्ये तिने खुलासा केलेला होता.

- Advertisement -

प्रियांकाचे आई वडील सैन्यात डॉक्टर होते. ती भारतात परत आल्यानंतर तिला बरेलीच्या आर्मी पब्लिक स्कूल (Army Public School) मध्ये प्रवेश मिळाला. तिचे आई वडील सैन्यात असल्याने त्यांची पोस्टिंग वेगवेगळ्या शहरात होत होती. त्यामुळे प्रियंकाचे शिक्षण दिल्ली, चंडीगड, अंबाला, लडाख, लखनऊ अश्या वेगवेगळ्या शहरात झाले.

प्रियांकाच्या आईने तिला फेमिना मिस इंडियामध्ये (Femina Miss India) भाग घेण्यासाठी पाठवले होते. यानंतर प्रियांका मिस इंडिया वर्ल्ड झाली. 2000 मध्ये प्रियंका मिस वर्ल्ड (Miss World) बनली. मिस वर्ल्ड जिंकणारी ती पाचवी भारतीय आहे.

मिस वर्ल्ड बनल्यानंतर प्रियंकाने अब्बास मस्तानच्या थ्रिलर(Thriller) फिल्म ‘हमराज’ मध्ये प्रियांका चोप्राला घेण्यात आले होते. पण, काही कारणास्तव अमीषा पटेल(Amisha Patel) ला सिनेमात घेण्यात आले. त्यानंतर 2002 मध्ये प्रियंकाने ‘तमीजहां’ या तमिळ चित्रपटातून अभिनयास सुरूवात केली.

2003 मध्ये प्रियंकाने ‘द हीरो – लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमात तिच्यासोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा देखील होते. त्यानंतर ती ‘अंदाज’, ‘मुझे शादी करोगी’, ‘ऐतराज’, ‘क्रिश’, ‘डॉन’, ‘फॅशन’, ‘दोस्ताना’ ‘अग्निपथ’, ‘बर्फी’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले.

बॉलिवूडनंतर(Bollywood) प्रियंका हॉलिवूडमध्ये क्वांटिको(Quantico) या अमेरिकन मालिकेत काम करून तिला जगभरात प्रसिध्दी मिळाली. याशिवाय ती बेवाच(Baywatch) या हॉलिवूड(Hollywood) चित्रपटात दिसली.

कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील(Cannes Film Festival) तिच्या ड्रेस मुळे तिला खूप प्रसिध्दी मिळाली.

2018 मध्ये प्रियंकाने अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनास (Nick Jonas) यांच्याशी विवाह केला. राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियंकाचे लग्न झाले. बॉलीवूडमधील सर्वात महागड्या विवाहापैकी एक होते.

प्रियांका चोप्राची नेट वर्थ ही दोनशे कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.

प्रियांका चोप्रा दरमहा 1.5 कोटींहून जास्त पैसे कमावते असे समोर आले होते.

या अभिनेत्रीचे मानधन जवळपास अठरा कोटींच्या घरात आहे.

प्रियांका वयाच्या चाळीशीत सुद्धा चाहत्यांना आपल्या फिटनेस आणि अभिनयासाठी आजही तितकीच लोकप्रिय आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या