Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकआ. ढिकलेंकडून नागरिकांना दिवाळी शुभेच्छा

आ. ढिकलेंकडून नागरिकांना दिवाळी शुभेच्छा

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच दिवाळी निमित्ताने लोकप्रिय आमदार राहुल ढिकलेंनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रभाग 3 मधील ओमनगर, भगवतीनगर, गुंजाळबाबा नगर,कमलनगर, लामखेडे मळा येथील विविध ठिकाणी मतदार बधू भगिनी यांच्या गाठी भेटी घेतल्या तसेच त्यांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक विषयांवर संवाद साधला व प्रभागात उद्भवणार्‍या समस्यांविषयी चर्चा करून त्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वस्त केले.

लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार असून हा प्रवास यापुढेही सुरूच राहणार आहे.यावेळी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून कामाची पोचपावती मिळाली.अशीच साथ सदैव राहील ही अपेक्षा!

यावेळी माजी नगरसेवक रुची कुंभारकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पप्पू माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सागर लामखेडे, राहुल मुखेडकर, किरण काळे, सौरभ सोनवणे,अमर बोरसे, शैलेश टर्ले, पिंटू बैरागी, अजय किंगे, नयन शेजवळ, शुभम कांबळे, समाधान शेवाळे, मयूर तांबे, शाम चव्हाण, शुभम पाटील, नितीन साम्रे, किरण गवळी, कान्हा द्रिवेदी, सागर गुंजाळ,संतोष आवारे,साई परदेशी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या