Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याIndependence Day 2023: PM मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाउंटचा DP, देशवासियांना केले...

Independence Day 2023: PM मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाउंटचा DP, देशवासियांना केले ‘हे’ खास आवाहन

दिल्ली | Delhi

भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याकरता आणि भारतीय झेंड्याबद्दल वेगवगेळ्या गोष्टी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा मोहीम राबण्यात येत आहे. यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

देशाच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘हर घर तिरंगा आंदोलना’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच त्यांच्या ट्विटर खात्यावरून एक ट्वीट केले आहे. “हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया खात्याचे डिपी बदलून भारताचा तिरंगा ठेवावा. सरकारच्या या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया, जेणेकरून देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील”, असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डीपी काढून तिरंग्याचा फोटो अपडेट केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपला डीपी बदलून तिरंग्याचा डीपी ठेवण्याचे आवाहन केलंय. अनेक नेत्यांनीही आपले डीपी बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या