Monday, April 28, 2025
Homeजळगावविवाहित महिलेचा छळ : सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

विवाहित महिलेचा छळ : सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

फैजपूर Faizpur ( प्रतिनिधी )

विवाहित महिलेचा (married woman) मानसिक व शारीरिक छळ (Mental and physical abuse) करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरोधात (Against five of the father-in-law) फैजपुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

विवाहित महिलेस मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन माहेरून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या ५ लोकांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विवाहित महिलेचे माहेर फैजपूर रथ गल्ली येथील असून सासरची मंडळी शिवनगर बाळापूर नाका अकोला येथील रहिवासी आहेत.

फिर्यादी श्रीमती लक्ष्मी राहुल सातळे (वय ३३) राहणार रथ गल्ली फैजपूर या विवाहित महिलेस शिवनगर बाळापुर अकोला येथील आरोपी सासू लता बाळकृष्ण सताळे, नणद भारती संदीप ताथे, भाची भक्ती संदीप ताथे, पूर्वा संदीप ताथे, भाचा दर्शन संतोष तांबट सर्व राहणार शिवनगर बाळापुर अकोला यांनी संगणमताने फिर्यादी श्रीमती लक्ष्मी राहुल सताळे घरातील मंडळींनी चारित्र्यावर संशय घेतला. तसेच ती माहेरून पैसे आणत नाही या कारणावरून तिला वेळोवेळी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून गांजपाट करून तिला तिचे माहेरी फैजपूर येथे हाकलून दिले.

फिर्याद श्रीमती लक्ष्मी राहुल सातळे या विवाहित महिलेने फैजपूर पोलीस स्टेशनला सासरच्या ५ लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ रविंद्र काशिनाथ मोरे करीत आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...